गुदद्वार म्हणजे मलद्वाराभोवती काहीही झाले की, सर्वसामान्य माणसांना वाटते की आपल्याला मुळव्याधच झाला आहे, पण मुळव्याध हा एकच व्याधी होत नसून अनेक प्रकारच्या व्याधी असू शकतात त्याबद्दल थोडक्यात माहिती देत आहोत.
वरील पैकी कोणतेही लक्षण आढळल्यास आपण डॉक्टरांना भेटावे व आजारापासून मुक्त व्हाव
उपचारानंतर सुरुवातीचे काही दिवस वेदना व रक्तस्त्राव होणे स्वाभाविक व अपेक्षित आहे. विशेषत: शौचानंतर अर्थात हा सगळा त्रास कमी करण्यासाठी आवश्यक / गरजेची सर्व औषधी दिलेली असतात. परंतु त्यामुळे त्रास पुर्णपणे बंद होऊ शकत नाही. दुखण्याची । वेदनेची तीव्रता ही रुग्णाचे वय, आजारांचे प्रमाण, त्याची शारीरिक व मानसिक स्थिती तसेच दुखणे सहन करण्याची सहनशक्ती यावर ही अवलंबून असते. त्यामुळे एकाच आजाराच्या उपचारदरम्यान होणारा त्रास व आजार बरा होण्यासाठी लागणारा कालावधी हा प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे रुग्णांनी एकमेकांच्या आजाराचा होणारा त्रास, कालावधी व लागणारा खर्च इ. तुलना करू नये. बहुतांशी रुग्ण उपचारानंतर दहा दिवसांच्या आतच आपल्या नियमीत दिनचर्येस सुरवात करतात, पण हे सर्व रुग्णांना लागू होत नाही. या गोष्टी देखील रुग्णाचे वय, आजाराचे प्रमाण, रुग्णाची सहनशक्ती, तसेच शारिरीक व मानसिक स्थिती यावर अवलंबून असते. उपचारानंतर खाण्यापिण्या संबंधी दिलेल्या सूचना व पथ्य पाळले तर आजार लवकर बरा होऊ शकतो. पथ्य पाळले गेले नाही तर आजार पुन्हा बळावला जाण्याची शक्यता असते, अशा वेळेस परत उपचार करावे लागू शकतात.